उमगाव सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

उमगाव सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

चंदगड / प्रतिनिधी

        उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रूप ग्रामपंचायतीचे सरपंच गणपती कृष्णा सुतार यांचे विरोधात दाखल झालेला ठराव आठ विरूध्द एका मताने मंजूर झाला. तहसीलदार विनोद रणवरे याच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. 

     उमगाव सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, अवास्तव खर्च करणे, खर्चाचा हिशेब न देणे, आपल्या मर्जीप्रमाणे प्रोसीडीग लिहीणे, स्वताःच्या मूलाला कामगार बनवणे असे आरोप उपसरपंच रूक्माना गावडे, महेश गावडे, लक्ष्मण गावडे, दत्तात्रय सूतार, सूप्रिया गावडे, लक्ष्मी गावडे, अपूर्वा पेडणेकर, रंजना कांबळे आदी सदस्यांनी ठेऊन अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानूसार सोमवार दि १५ मार्च २०२१ रोजी उमगांव ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दुपारी बारा वाजता विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आठ सदस्यांनी हात उंचावून सरपंच सूतार यांच्या विरोधात मतदान केल्याने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पार्वती देवळी या महीला सदस्या तटस्थ राहील्या.
No comments:

Post a Comment