प्राथमिक शिक्षक बँक 'फास्ट टॅग' सेवा पुरवणार - चेअरमन पोतदार, हलकर्णी शाखा सदिच्छा भेट प्रसंगी प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

प्राथमिक शिक्षक बँक 'फास्ट टॅग' सेवा पुरवणार - चेअरमन पोतदार, हलकर्णी शाखा सदिच्छा भेट प्रसंगी प्रतिपादन

शिक्षक बँक चेअरमन प्रशांत पोतदार यांचे स्वागत करताना वसंत जोशीलकर शिवाजी पाटील, रमेश हुद्दार आदी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार यांच्या सहकार्यामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. मयत सभासदांना संपूर्ण कर्ज माफी योजना सुरू आहे. भविष्यात बँक सर्व सभासद व पेन्शन धारकांना विमा संरक्षण तसेच 'फास्ट टॅग' सेवेसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँक चेअरमन प्रशांत पोतदार यांनी केले. ते हलकर्णी ता. चंदगड शाखा सदिच्छा भेट प्रसंगी सभासदांशी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक संघ तालुकाध्यक्ष रमेश हुद्दार होते.

      स्वागत वसंत जोशिलकर यांनी केले तर प्रास्ताविक बँकेचे तालुका संचालक शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलताना पोतदार म्हणाले, चंदगड तालुक्यात शिक्षक संघ अभेद्य आहे, असे सांगून भविष्यात राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत पुन्हा शिक्षक संघाचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला.

         यावेळी व्हाईस चेअरमन अरुण पाटील,  विद्यमान संचालक राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे, संघाचे सरचिटणीस  दस्तगीर  उस्ताद, कार्याध्यक्ष  शाहू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, अशोक नौकुडकर, अशोक भोईटे, टी. जे. पाटील, महादेव सांबरेकर, अनंत मोटर, एन. के. शिंदे, अनंत धोत्रे, ग. स. पाटील, नंदकुमार होनगेकर, गणपत लोहार, दयानंद पवार, डी. सी. पी. एस. संघटनेचे संघटक अडसुळे, शाखाधिकारी जयसिंग देसाई,  विलास बेनके, जीवन आजगेकर, नीलम रेडेकर आदींसह शिक्षक सभासद  उपस्थित होते. आभार भरमू तारीहाळकर  यांनी मानले.

No comments:

Post a Comment