बेळगाव / प्रतिनिधी
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगाडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. मतदान १७ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २३ मार्च रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० मार्च आहे. ३१ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार ३ एप्रिल पर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेवू शकतात. १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.मतमोजणी २ मे रोजी रविवारी होणार आहे.
No comments:
Post a Comment