महागाव येथील एस. जी. एम. वक्तृत्व स्पर्धेत अपुर्वा पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2021

महागाव येथील एस. जी. एम. वक्तृत्व स्पर्धेत अपुर्वा पाटील प्रथम

एस. जी. एम. वक्तृत्व स्पर्धेतील विजेते

चंदगड / प्रतिनिधी

       महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात यशवंतराव चव्हाण याच्यां जन्मदिनानिमित्य आयोजित 'एस. जी. एम. शब्दगौरव' वक्तृत्व  स्पर्धेत  गडहिंग्लज हायस्कुल व ज्युनि. कॉलेजचे विद्यार्थीनी अपुर्वा पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धासाठी जिल्ह्यातील विविध शाळेमधून ६६ विद्यार्थी सहभाग घेत उस्फुर्थ प्रतिसाद दिला.

        प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यानी स्वागत व प्रस्तावन केले. स्पर्धाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण याच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण याच्या कार्यपद्धतीला उजाळा देत अभिवादन करण्यात आले. कोरोना पाश्वभुमीवर स्पर्धाचे प्राथमिक फेरी ऑनलाईन तर अंतिम फेरी निवडक विद्यार्थाची प्रत्यक्ष उपस्थितीत झाली. यामध्ये द्वितीय प्रगती गुरव (चन्नेकुपी), तृतीय  प्रज्ञा माळकर(शिरोळ) तर उत्तेजनार्थ म्हणून वैष्णवी पाडळे (गडहिंग्लज) यांनी क्रमांक पटकावला. विजेत्याना मान्यवराच्या हस्ते बक्षिसासह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला.

          यावेळी यशवंत चव्हाण, सचिव  डॉ.  बाळासाहेब चव्हाण, प्रा. के. जी. कुरळे, प्रा. अजिंक्य चव्हाण, व्हि. एन. बुगडीकट्टीकर, डी. पी. कोळी शिक्षक व  विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. कल्याणी चव्हाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment