कडगाव, भुदरगड येथे एकाच छताखाली वाचनालय, व्यसनमुक्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2021

कडगाव, भुदरगड येथे एकाच छताखाली वाचनालय, व्यसनमुक्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

कडगाव येथील वाचनालय, व्यसनमुक्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची नवी इमारत.

गारगोटी : सी एल वृत्तसेवा 

    'बुडती हे जन, न देखे डोळा! म्हणोनी कळवळा येत असे!!'

    थोर संत, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विचारांचे पाईक बनून मराठा सेवा संघ प्रणित, 'शहाजी राजे फाउंडेशन', कडगाव , ता. भुदरगड यांचेमार्फत संपूर्णपणे लोक सहभागातून साकारलेल्या स्वराज्य रक्षक शंभूराजे वाचनालय, संत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र व राष्ट्रमाता जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.  

      कडगाव येथील सुधाकर देसाई यांच्या सहकार्याने कार्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सर्व लोकांसाठी संपूर्णपणे लोकसहभागातून सुरू असलेल्या वरील तिन्ही केंद्रांसाठी उपयुक्त अशी सर्व प्रकारची नवी-जुनी पुस्तके, ग्रंथ, धर्मग्रंथ, महापुरुषांचे फोटो, पुतळे, फर्निचर आदी दान करून या सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहाजी रामकृष्ण देसाई, कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर मो. ८२७५६४०६४० येथे संपर्क साधावा.No comments:

Post a Comment