शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे - अध्यक्ष धनाजी पाटील, तुडये येथे गुणवंत शिक्षकांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2021

शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे - अध्यक्ष धनाजी पाटील, तुडये येथे गुणवंत शिक्षकांचा गौरव

तुडये  येथे गुणवंत शिक्षकांचा सत्कार करताना मान्यवर.

नेसरी प्रतिनिधी / पुंडलिक सुतार

         शिक्षक समिती चंदगड च्या वतीने आज तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तुडये  येथे गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला, 

     जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शामराव पाटील सर,शिष्यवृत्ती मार्गदर्शक प्रशांत पाटील , शिवाजी कोळेकर,मोहन सुतार ,फौंडेशन चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शकुंतला सुतार, गोपाळ चौगले ,शशिकांत सुतार ,प्रज्ञाशोध मार्गदर्शक के पी भोगण आदी शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला 

        प्रास्ताविकात सरचिटणीस एन .व्ही.पाटील  यांनी शिक्षक समितीत प्रथम सेवा ,ज्ञानदानाचे कार्य  नंतर संघटना असा सल्ला दिला तसेच शिक्षक समिती संघटना सदैव चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी राहील ,कदापिही अन्याय सहन करणार नाही असे मत व्यक्त केले. 

      माजी सरचिटणीस व जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील यांनी संघटनेने केलेला सन्मान हा खूप मोठा सन्मान आहे , आशिच कौतुकाची थाप सदैव शिक्षकांच्या पाठीवर असावी असे मत व्यक्त केले 

     अध्यक्ष धनाजी पाटील यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले ,तुडये केंद्रातील शिक्षक तालुक्यातसाठी आदर्श आहेत , या केंद्राने सलग 3 वर्षे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पटकाविला याबद्दल या केंद्राचे केंद्रप्रमुख चौधरी साहेब, केंद्रमुख्याध्यापिक दयावती पाटील ,व सर्व गुणवंतांचे कौतुक केले, 

    या कार्यक्रमासाठी तालुका नेते प्रकाश बोकडे,जिल्हा नेते एल. वाय.लाळगे,मुख्याध्यापक संघटना तालुका अध्यक्ष नामदेव चौगले ,शिक्षक पतसंस्था चेअरमन जोतिबा नाकाडी, शाखा चेअरमन सुरेश सावंत, आदर्श शिक्षक गोविंद चांदेकर, पूनम शिंदे,तन्वी देसाई व सर्व शिक्षक उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा गायकवाड व आभार  अजय पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment