शिक्षकांच्या 'ड्रेसकोड सक्ती' ला संघटनांचा विरोध, समन्वय समितीचे सभापती, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

शिक्षकांच्या 'ड्रेसकोड सक्ती' ला संघटनांचा विरोध, समन्वय समितीचे सभापती, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

चंदगड पंचायत समिती सभापती अनंत कांबळे, गशिआ सौ. सुभेदार व एम. टी. कांबले यांना निवेदन देताना शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हा परिषदेने जि. प. शाळेतील शिक्षक, शिक्षिकांना विशिष्ट रंगातील गणवेशात शाळेत येण्यासाठी आदेश काढले आहेत. जि. प. शाळेतील शिक्षक शिक्षिकांना गणवेशाद्वारे ओळख निर्माण करून  द्यायचा जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी यांचा मनोदय आहे. तथापि या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या अनुषंगाने आज चंदगड  तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी व प्रतिनिधींनी ही 'ड्रेसकोड सक्ती' मागे घ्यावी. याबाबतचे निवेदन चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार व शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांना सादर केले. ड्रेसकोड बाबतीत शिक्षकांच्या तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होऊ दिली जाणार नाही. हा आदेश मागे घेण्यासंदर्भात जि. प. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू असे  आश्वासन सभापती कांबळे यांनी सर्व संघटना समन्वय समितीला दिले. यावेळी रमेश हुद्दार, धनाजी पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, सदानंद पाटील, अशोक नौकुडकर, बाबू परीट, एन. व्ही. पाटील, रवींद्र साबळे, राजू जोशी आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment