उद्योजक मोहन परब यांना बंधुशोक - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

उद्योजक मोहन परब यांना बंधुशोक

 

राजाराम संतू परब

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

            सातवणे (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी राजाराम संतू परब (वय -६५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी दि. २ रोजी रक्षाविसर्जन होणार आहे. बेळगाव येथील रहिवासी व कोल्हापूर जिल्हा काजू प्रक्रिया उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मोहन परब यांचे ते बंधू होते. तसेच सातवणे येथील चाळोबा विकास सेवा संस्थेचे संचालक गुंडू परब व वारकरी पंथाचे कार्यकर्ते विष्‍णू परब यांचे ते भाऊ होत.No comments:

Post a Comment