नागनवाडी येथे कोवीड लसीकरणाची सोय - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

नागनवाडी येथे कोवीड लसीकरणाची सोय

नागनवाडी (ता. चंदगड) येथील आरोग्य उपकेंद्रात कोवीड लस घेण्यासाठी आलेले लोक.

चंदगड / प्रतिनिधी

    नागनवाडी (ता. चंदगड) येथील आरोग्य उपकेंद्र हात कोवीड लसीकरणाची सोय नागरिकांसाठी सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी दिली.

       कानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारा या नागनवाडी उपकेंद्रात सुरू केलेल्या कोवीड लसीकरणाचा नागनवाडी, कुर्तनवाडी, नरेवाडी, कोरज, दाटे, बेळेभाट, जट्टेवाडी, मजरे जट्टेवाडी, गुडेवाडी, वरगाव बेरडवाडा या गावातील ४५ ते त्या पुढील वयोगटातील नागरिकांना होणार आहे. कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी कमी करून नागरिकांना वेळेत लसीकरण मिळावे. तसेच कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामाचा अतिरिक्त भार कमी होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. नागनवाडी उपकेंद्रात सुरू केलेल्या लसीकरणासाठी डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

      या लसीकरणाचा लाभ वरील गावातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment