तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सचिन महादेव पाटील याने सेट परिक्षेत उज्वल यश संपादन केले.
सचिन याने संख्याशास्त्र या विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण केली . सध्या सचिन शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे पीएच डी करत असून त्याला प्रा .एच. व्ही . कुलकर्णी मॅडम , डॉ .ए.व्ही. दोरूगडे व इतर शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले . अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेल्या सचिनच्या या यशाबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थ व एकता गृपच्या वतीने अभिनंदन केले जात आहे .
No comments:
Post a Comment