होम आयसोलेट असलेल्या कोरोना बाधिताच्या घरच्यांकडून आशा वर्करना अरेरावी, आशा वर्करांचा काम बंदचा इशारा, वाचा कोठे घडलेली घटना...... - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2021

होम आयसोलेट असलेल्या कोरोना बाधिताच्या घरच्यांकडून आशा वर्करना अरेरावी, आशा वर्करांचा काम बंदचा इशारा, वाचा कोठे घडलेली घटना......


 तेऊरवाडी (एस.के.पाटील )

कोवाड (ता. चंदगड) येथे चार दिवसामागे कोरोना पॉजिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी सर्व्हे साठी गेलेल्या आशा वर्कर ना अरेरावी केल्याचा प्रकार आज घडला. आरोग्य यंत्रणेवर अरेरावी करणाऱ्या या प्रकाराविरोधात चंदगड आशा वर्करनी काम बंदचा इशारा दिला आहे .
    सविस्तर माहिती अशी कि, आठवड्यामागे येथील युवक  पुण्यावरून गावात दाखल झाला असून गेल्या मंगळवारी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट  पॉजिटिव्ह आला आहे.त्यादरम्यान त्याने घरी बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या गर्दीत कोरोणा नियमांचे उल्लंघन करून केला असल्याचे समोर आले आहे.पॉजिटिव्ह आलेल्या युवकाला सध्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली होम आयसोलेट करण्यात आले आहे . शनिवारी येथे काम करत असलेल्या आशा वर्कर या त्याठिकाणी सर्व्हे साठी गेल्या असताना सदर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्या युवकाच्या घरच्या नी प्रचंड शिविगाळ केली .त्यामुळे घडल्या प्रकारावरून आशा या आक्रमक झाल्या असून याबाबत जोवर निर्णय होत नाही तोवर काम बंद करणार असल्याची भूमिका आशां कडून घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा वर्कर चा उपयोग होतो . त्या ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये  मध्यस्थीचे काम करतात . ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता , लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप , हगवण , लहान - मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते . तसेच DOTS , Folic Acid आणि Chloroquin बरोबरच आर्सेनिक अल्बम सह इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा वर्कर मार्फत केली जातात . ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती , स्तनपान , लसीकरण , गर्भप्रतिबंधक उपाययोजना , जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग , लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग , नवजात अर्भकाची काळजी इ . आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा वर्कर सदैव तत्पर असतात . आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आशा वर्कर ओळखल्या जात असून आशा या एक प्रशिक्षित ( आरोग्य ) कर्मचारी असुन आदिवासी व गैर - आदिवासी भागातील जनता व ( आरोग्य विषयक ) सरकारी कर्मचारी यांच्यात दुव्याचे काम करतात . समाजात आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न उदभवल्यास प्रथम आशा ला कळवले जात असून समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम आशा वर्कर मार्फत केले जाते . 
सद्यस्थितीत पहायला गेलं तर कोरोना च्या कालखंडात खऱ्या अर्थाने आशा वर्कर चे महत्व अधोरेखित झाले आहे..स्वतः चा जीव धोक्यात घालून तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आपली सेवा ही बजावताना दिसत आहेत.
 मग ते आजारी व्यक्तींच्या शरीराचे तापमान घेतेवेळी असो वा आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या वाटपावरून असो आमची आई तापमान घेताना घाबरते,तुम्ही नका येऊ ....असे म्हणत उच्चशिक्षित लोकांकडून देखील त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली नसल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळाली आहेत.
त्यातच कहर म्हणून कोवाड मध्ये होम आयसोलेशन असलेल्या गेल्या चार दिवसामागे आढळून आलेल्या कोरोना बाधिताच्या  घरी शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या आशा वर्कर ना अर्वाच्च भाषेत कोरोना बाधिताच्या घरातील व्यक्तींकडुन बोलल्याचे  समजते .त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोग्य सेवकांना देखील उद्धट शद्ब सुनावल्याचे समजते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून स्थानिक कोरोना समित्या सक्रिय करण्याच्या सूचना असताना स्थानिक प्रशासन मात्र यावर मूग गिळून गप्प असल्याचे दिसत आहे.या सर्व प्रकाराबाबत मात्र आशा मध्ये नाराजीचा सूर असून जोवर माफीनामा मिळत नाही तोवर काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


-कोरोना च्या संकटामध्ये या कोरोनाच्या रणरागिनींच्या पाठीशी ठाम पणे उभे राहण्याची गरज असताना असे प्रकार वारंवार होत असताना पहायला मिळत आहेत.ही लाजिरवाणी गोष्ट असून घडल्या प्रकाराची माहिती ही तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समोर मांडली असून सोमवार पासून कोवाड आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे काळ्या फिती लावून काम करणार असून माफीनामा न आल्यास काम बंद करण्याचा इशारा आशा वर्कर कडून देण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment