![]() |
दुबई : आरती पाटील व मानसी जोशी पदाकासह. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
दिव्यांग खेळाडू आरती ज्ञानोबा पाटील ही 29 मार्च पासून सुरू असलेल्या दुबई येथील बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर्फे आयोजित स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने दुहेरी महिला विभागांमध्ये ब्राँझ पदक पटकावले. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरती पाटील ही मूळची खानापूर (नंदगड) येथील असून सध्या ती कोल्हापूर जवळील उचगाव येथे वास्तव्यास आहे. दुहेरी महिला विभाग स्पर्धा असल्याने तिला मानसी जोशी (मुंबई) यांची भागीदारी मिळाली.
तिला सोलापूर येथील प्रशिक्षक सुनील देवांग, फिजिओ डॉ. संदीप भागवत, सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीचे प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे मार्गदर्शन मिळत आहे तर कागल येथील शाहू कारखाना व हिंदुस्तान पेट्रोलियम आर्थिक सहकार्य लाभत आहे.
No comments:
Post a Comment