`रवळनाथ ' हौसिंग सोसायटीला १ कोटी 40 लाखांचा नफा, एम. एल. चौगुले, कोरोना वर्षातही उत्तम कामगिरी - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2021

`रवळनाथ ' हौसिंग सोसायटीला १ कोटी 40 लाखांचा नफा, एम. एल. चौगुले, कोरोना वर्षातही उत्तम कामगिरी

एम. एल. चौगुले 


(कागणी : संदीप तारीहाळकर)

कागणी / सी. एल. वृत्तसेवा

२०२० ते २०२१ या अर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीला १ कोटी 40 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. कोरोना काळात ही संस्थेने उत्तम कामगिरी करून प्रगती चा चढता आलेख कायम ठेवला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.

 चौगुले म्हणाले, 31 मार्च अखेर संस्थेची सभासद संख्या 8063 इतकी आहे. एकूण 310 कोटी 87 लाख रुपयांच्या ठेवी तर 218 कोटी 70 लाखांचे कर्ज आहेत. खेळते भांडवल 345 कोटी 70 लाख रुपये असून एकूण गुंतवणूक 111 कोटी 14 लाख इतकी आहे. एकूण वार्षिक व्यवसाय 529 कोटी 97 लाखाचा झाला असून 1 कोटी 40 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेची स्वतःची वेबसाईट असून त्यावरून वार्षिक अहवालासह दैनंदिन घडामोडींची माहिती दिली जाते. सध्या एसएमएस, बँकिंग, सीबीएस, मायक्रो एटीएम, डेबिट कार्ड याद्वारे डिजिटल सेवा दिली जाते. याशिवाय पेन्शनधारक व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा सुरू आहे. लवकरच संस्थेला आय एफ एस सी कोड ही मिळेल. गडहिंग्लज येथे संस्थेची स्वमालकीची प्रधान कार्यालयाची प्रशस्त इमारत आहे.

एकूण 9 पैकी गडिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर व कुडाळ या शाखादेखील स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव व सर्व संचालक, सर्व शाखांचे चेअरमन, सल्लागार, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचे सहकार्य लाभत असल्याचे चौगुले यांनी सांगितले.


                            कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी 

कोरोनामुळे संस्था आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी गत वर्षात 20 टक्के महागाई भत्ता आणि वेतन वाढ स्वेच्छेने नाकारून त्याग केला होता. परंतु कोरोना काळात ही संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राहिली आहे. त्यामुळे 2020- 21 या वर्षात कर्मचाऱ्यांना 2 वेतनवाढी आणि 20 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असेही चौगुले यांनी सांगितले.

                             बेळगाव शाखा प्रथम

 सभासद नोंदणी, ठेवी  संकलन व कर्ज वाटपात बेळगाव शाखेने सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यासाठी शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेनसे व सल्लागार व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment