मांडेदुर्ग : हातपंपाद्वारे निर्जंतुकीकरण प्रसंगी सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच गणपती पवार, व सदस्य तानाजी पाटील. |
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे एकूण कोरोना संख्या ९ झाली ग्राम पंचायत कर्मचारी पॉझिटिव्ह असून काही रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सरपंच विनायक कांबळे व उपसरपंच गणपती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गावातील हायस्कूलमध्ये विलगीकरण करण्याचे काम सुरु आहे. तसेच गावातील प्रमुख गल्ल्यांमध्ये तसेच अन्य नागरी वस्तीमध्ये निर्जंतुकीकरणचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गावच्या प्रवेशद्वारावर ओंडके टाकून प्रवेश निषिद्ध असल्याचा फलक लावून कोरोना बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच विनायक कांबळे व उपसरपंच गणपती पवार सदस्य तानाजी पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment