चंदगड तालुक्यातील पाच हजार हाॅटेल कर्मचा-यावर उपासमारीची वेळ, शंभरहून अधिक हाॅटेल मालक कर्जबाजारी - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2021

चंदगड तालुक्यातील पाच हजार हाॅटेल कर्मचा-यावर उपासमारीची वेळ, शंभरहून अधिक हाॅटेल मालक कर्जबाजारी

 

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

       संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका समाजातील सर्वच घटकाना बसत आहे.सर्व उद्योग बंद पडले आहेत. पर्यटन व हॉटेल व्यवसायावर तर मोठे संकट आले आहे. या व्यवसायात चंदगड तालुक्यातील किमान पाच हजार कामगार अवलंबून आहेत.या पाच हजार कूटूबांवर  उपासमारीचा सामना करावा लागत आहे तर भाडेतत्वावर व कर्ज काढून चालवायला घेतलेले  शंभरहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.   

         तालुक्यातील विशेषता पश्चिम भागातील युवक नोकरीच्या मागे न लागता उदरनिर्वाहासाठी पूणे, मुंबई,कोल्हापूर, अलिबाग, नाशिक, पंढरपूर, ठाणे, औरंगाबाद,बेळगाव, गोवा व कर्नाटक राज्यात हाॅटेल मध्ये कामाला आहेत. दहा हजार ते चाळीस हजार रुपये पगारावर चहाची टपरी ते पंचतारांकित हॉटेलात कामाला असणा-या यूवकानी या व्यवसायात बर्यापैकी प्रगती केली आहे. शहरात व गावाकडे कर्जे काढून घरे घेतली आहेत. पण गेल्या चौदा महिन्यापासून हाॅटेल व्यवसायचं बंद झाल्याने गेल्या वर्षभरापासून ते कामगार कामावर नाहीत.वर्षभर हॉटेल सुरु नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस फूगत आहे.या हॉटेल कामगार असल्याची नोंद सरकारी दरबारी नसल्याने सरकारची कोणतीही मदतीची शक्यता नाही . कमावणारा माणूस बेकार झाला तर त्याची मानसिक स्थिती चांगली नसते . तालुक्यातील हजारो हात सध्या रिकामे आहेत .त्यांचे दरमहा येणारे कोट्यवधी रुपये  बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तर हाॅटेेल मध्येच काम करता-करता भाडेतत्वावर व कर्ज काढून हाॅटेल चालवायला घेेेेतलेल्या कर्मचार्याचा हाॅटेल मालक बनू पहाण्यार्या चंदगड तालुक्यातील शंभरहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.  

              हॉटेल मधील कामगारांसाठी महामंडळ स्थापन करा

       हॉटेलमधील कामकरणारा कामगार वर्ग संघटित नाही. त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसायावर संक्रात कोसळली आहे. एवढा मोठा व्यवसाय बंद करताना त्यातील कामगार वर्गाला कर्जाचे ओझे घेऊन उपासमारी ला तोंड द्यावे लागत आहे, शासनाने या लक्ष देणे गरजेचे आहे. या कर्मचा-यासाठी लघू महामंडळ स्थापन करावे असे शंकर ढोणुक्षे (केरवडे, ता. चंदगड) सध्या अलिबाग येथील हाॅटेल व्यवसायिक.



No comments:

Post a Comment