कोदाळी येथील माऊली देवालयाची यात्रा रद्द, कोरोनाच्या संकटामुळे निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2021

कोदाळी येथील माऊली देवालयाची यात्रा रद्द, कोरोनाच्या संकटामुळे निर्णय

कोदाळी येथील माऊली देवीची मुर्ती.

 चंदगड / प्रतिनिधी

        कोदाळी (ता. चंदगड)  येथील माऊली देवीची वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने दिली.
      चंदगड सह कोकण, कर्नाटकातील सीमा भागातील  भाविक मोठ्या प्रमाणात  माऊली देवीच्या यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन दरवर्षी यात्रेला होणाऱ्या गर्दीचा उच्चांक पाहून सोमवार दि. ५ ते ७ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व कोकण भागातील भाविकांनी यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे यात्रेला हजेरी लावू नये. जे कोण भाविक यात्राकाळात जाणूनबुजून मंदिर परिसरात दाखल झाल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दरवर्षी होणाऱ्या यात्रेचा नियम बंद करता येणार नसल्याने देवस्थान कमिटीतील मोजक्याच मानकांच्या उपस्थितीत देवीची पुजाअर्चा व धार्मिक कार्यक्रम विधीवत उरकले जाणार आहेत. कोदाळी पंचक्रोशीसह सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment