![]() |
बाची चेकपोस्टवर खाजगी गाड्यांची तपासणी करून सोडण्यात येत आहे. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा (संजय पाटील)
चंदगड तालुक्यातून चंदगड-बेळगाव सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी,वेंगुर्ला येथून कर्नाटक राज्यात बेळगावला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना कर्नाटक पोलिसांकडून बाची चेक पोस्टवर अडवण्यात येत आहे. कर्माटकच्या बसेसना मात्र महाराष्ट्रात प्रवेश आहे. या सर्वांचा फटका प्रवाशांना बसून त्यांचे मात्र हाल होत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वारंवार खरा त्रास सहन करावा लागत आहे. तो सीमा भागातील नागरिकांना. याचे कारण कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार कर्नाटक च्या सीमा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येत आहेत. यामुळे एस. टी. महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याबरोबरच प्रवाशांचीही मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीचे तसेच महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारी चे कारण दाखवून अचानक सीमा बंद करण्यात येत आहेत. मात्र याच ठिकाणावरून खाजगी दुचाकी सह चारचाकी वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत आहेत. बस मधून प्रवास करायचा झाल्यास कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट ची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाच्या या वागणुकीमुळे सीमा भागातील नागरिक पुरते बेजार झाले असून नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. चंदगड तालूका व बेळगावचे व्यापारी, शैक्षणिक व वैद्यकिय संबध आहेत. चंदगड चा भाजीपाला बेळगावला जातो. येथील हजारो लोक वैद्यकिय उपचारासाठी बेळगावला ये- जा करतात. पण आता बेळगाव प्रशासनाने सिमा बंद केल्याने सर्वांची मोठी गैरसोय झाली आहे.
No comments:
Post a Comment