कालकुंद्रीत कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात ५२४ जणांना लस - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2021

कालकुंद्रीत कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात ५२४ जणांना लस

लसीनंतर दक्षता कक्षामध्ये थांबलेले नागरिक यावेळी सरपंच उपसरपंच व गोळ्या देताना आरोग्य कर्मचारी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथे एक दिवसीय कोवीड-१९ लसीकरण कार्यक्रमास  ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. आ. केंद्र कोवाड येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी २४ मार्च रोजी ६० वर्षावरील सर्व व ४५ ते ५९ वर्षातील आजारी २७० नागरिकांना लस देण्यात आली होती.  पुन्हा शनिवार ३ एप्रिल रोजी नव्या नियमानुसार  ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. 

कालकुंद्री येथे कोरोना लसीकरणासाठी आलेले नागरीक.

       यावेळी २५४ तर दोन दिवसांत ५२४ पुरुष- महिलांनी लाभ घेतला. ग्रामस्थांच्या सुविधेबद्दल सरपंच छाया जोशी व उपसरपंच संभाजी पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी आर के खोत व प्राआ. केंद्र कोवाडचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. प्रसन्न चौगुले यांचे आभार मानले. यावेळी एस के मुर्डेकर, नारायण पाटील, शशिकांत सुतार, दशरथ पाटील आदी उपस्थित होते. लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका रेणुका कांबळे, प्रतिभा पाटील, रोहन भास्कर, आशा स्वयंसेविका अंजना सागर पाटील, माया तानाजी पाटील, सुमन सकट, अनिता लाड, अंजना बामणे, मदतनीस लक्ष्मी हुंदरे, आशा पर्यावेक्षिका सरिता पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सागर पाटील, नरसु कांबळे यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment