सामाजिक भान राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - घन: श्याम पाऊसकर, दाटे येथे रयत सेवा फाउंडेशनची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2021

सामाजिक भान राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - घन: श्याम पाऊसकर, दाटे येथे रयत सेवा फाउंडेशनची स्थापना

रयत सेवा फौंडेशनच्या स्थापनेप्रसंगी संजय साबळे , विनायक पाऊसकर व मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      "समाजामुळेच आपल्या व्यक्तीमत्वाला बहर येतो. आपण घडतो ते समाजामुळेच. म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक भान राखून काम करणे गरजेचे आहे " असे प्रतिपादन रयत फाउंडेशनचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान घनःश्याम पाऊसकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशराम किणेकर यांनी केले.

         मंत्रालयीन अधिकारी घनश्याम नारायण पाऊसकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने दाटे गावातील उच्चशिक्षित,नोकरदार व सामाजिक कार्याची आवड असलेल्या संजय साबळे, राजेंद्र मोटर, विनायक पाऊसकर, दीपक साबळे, बाळू सातर्डेकर,पांडुरंग मोटर, निंगोजी मोटर,दिलीप साबळे, गिरीश गुरव, परशराम किणेकर, ज्ञानेश्वर गावडे, मनोज खरुजकर, शाहू खरुजकर, मारुती किंदळेकर, अमर खरुजकर व राजू बुरुड तरुण व धडाडीच्या युवकांनी "रयत सेवा फाउंडेशन" ची स्थापना केली. सदर रयत सेवा फौंडेशनमार्फत कोरोना महामारीच्या कालावधीत सेवा केलेल्या दाटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या  अखत्यारीतील दाटे, बेळेभाट, नरेवाडी,नाईकवाडा व वरगाव या गावात कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, डॉक्टर, आरोग्य सेविका व आरोग्य सेविकांची मदतनीस यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

        कोरोना काळात दाटे गावात उत्तमरीतीने काम केलेल्या डॉ. विलास पाटील, डॉ. संतोष शिंदे यांचा घनशाम पाऊसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.अनघा व्हडावडेकर, रेखा पाटील, वंदना पाटील या आशा सेविकाना पाच हजार रु. सन्मान निधी प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. स्मिता मोरे, शोभा नाईक, ज्योती पाटील सुगंधा पाटील, बायव्वा नाईक या अंगणवाडी सेविकांचा तर मंगल पावले, सुनिता खरूजकर,मल्लवा धामणेकर, चांगुणा धुरी, शोभा पाटील या अंगणवाडी मदतनीस यांचा सत्कार सौ. रिचा पाऊसकर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. दाटे आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका श्रीमती महानंदा कुरणे व त्यांच्या मदतनीस शुभांगी साबळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी घनशाम पाऊसकर यांचा रयत सेवा फाउंडेशमार्फत परशराम किणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

           यावेळी सरपंच अमोल कांबळे, संतोष मोरे, माधुरी मोरे, सरीता गुरव, अनिता पाटील, विवेक पाटील, शिवाजी पाटील, नामदेव नाईक, सुहास पाटील, सागर नाईक, सूरज नाईक ,रवळू कांबळे व रयत सेवा फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले. तर आभार  ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment