तिलारी वीज निर्मिती कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2021

तिलारी वीज निर्मिती कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तिलारी येथील वीज निर्मिती कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी. 

चंदगड / प्रतिनिधी 

       तिलारी (ता. चंदगड) येथील वीजनिर्मिती मुख्य कार्यालया मध्ये भारतरत्न डॉ.बाबासहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. तिल्लारी वीजनिर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता बी. एम.शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी उपअभियंता गणाचारी, पट्टणकूडे, आर. ए. पाटील, राजू कांबळे, सतिश कांबळे, नारायण कुंभार, सागर कांबळे, सागर माळवी यासह  कर्मचारी सोशल डिस्टसिंग पाळून उपस्थित होते.No comments:

Post a Comment