चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2021

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

आंबेडकर जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर, नगरसेविका नेत्रदीपा कांबळे, प्रमोद कांबळे व मंडळाचे कार्यकर्ते.

चंदगड / प्रतिनिधी 

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालूक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधे पणाने साजरी करण्यात आली.

       चंदगड येथील आंबेडकर नगरात नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद कानेकर यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नगरसेविका नेत्रदीपा प्रमोद कांबळे, नगरसेवक सचिन नेसरीकर, विरोधी गटनेता दिलीप चंदगडकर, मुख्याधिकारी अभिजित जगताप, दिनेश कांबळे, कुणाल कांबळे, मनोज कांबळे, आकाश कांबळे, राहुल कांबळे, युवराज कांबळे, राजू कांबळे, सिद्धू कांबळे, शरद कांबळे, रब्बानी मदार, राहुल  धूपदाळे, शिवाजी कांबळे, रवींद्र कांबळे, सचिन कांबळे, दीपक कांबळे यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रमोद कांबळे यांनी मानले.

         चंदगड येथील न्यु इग्लिश स्कूल मध्येही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक आर. आय पाटील यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

          तिलारीनगर येथे विज वितरण कार्यालयातही जयंती साजरी करण्यात आली.  अभियंता बी एम शिंदे यांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

      डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.   

चंदगड तालुका समाज सुधारणा मंडळ चंदगड येथे आंबेडकर जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवर.

        चंदगड तालुका समाज सुधारणा मंडळ, चंदगड येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळून साजरी करण्यात आली. आयु. गणपती रामू कांबळे (नांदवडे), आयु. श्रीकांत अर्जुन कांबळे (चंदगड), रयसोद्दीन मुल्ला, कलिम मदार, विनायक कानूरकर, मोईन मुल्ला  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment