सोमवारपासून चंदगडकरांना बेळगाव बंद! आज, उद्या कामे उरकून घ्या! काय आहे कारण? वाचा चंदगड लाईव्ह...! - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

सोमवारपासून चंदगडकरांना बेळगाव बंद! आज, उद्या कामे उरकून घ्या! काय आहे कारण? वाचा चंदगड लाईव्ह...!


कागणी : सी एल. वृत्तसेवा / (एस. एल. तारीहाळकर)

       बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कर्नाटकात सोमवार दि. १० पासून १४ दिवस संपूर्ण लाॅकडाऊनची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी  केली. 

    चंदगड तालुक्याला रोटी-बेटीच्या व्यवहारासाठी तसेच अत्यावश्यक उपचारासाठी बेळगाववर अवलंबून रहावे लागते. गतवर्षी कोरोना काळात बंदी घातल्याने काही चंदगडकरांचे उपचाराअभावी प्राण गेले आहेत. अशी बंदी पुन्हा झाली तर मोठे संकट येणार आहे. प्रवेशासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा पास गरजेचा आहे. सोमवारपासून कडक लॉकडाऊन आहे. या काळात लग्न सोहळ्यांना परवानगी नाही. बेळगावचे कामगार ही येणार नाहीत. कृषीमाल बेळगावला जाणार नाही. बेळगाव आणि चंदगड मध्ये वधू वरांची लग्ने नियोजित आहेत. त्यामुळे चंदगडकरांची पंचाईत झाली आहे.  तसेच बेळगाव मध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार संपूर्ण बंद (पार्सल सेवेसह) ठेवनार आहेत. शनिवार-रविवार संपूर्ण संचारबंदी असून

        जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस सूट असेल. सकाळी ९ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. सर्वच प्रकारच्या वाहन संचाराला निर्बंध घालण्यात आला आहे. सद्या असलेली जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची सूट रद्द करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पास सक्तीचा करण्यात आला आहे. सदर पास मिळवण्यासाठी आतापासूनच चौकशी करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment