सांग सांग भोलानाथ, पाऊस अन कोरोना जाईल काय? कोल्हापूर जिल्हा पावसाने अन कोरोणाने हैरान - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

सांग सांग भोलानाथ, पाऊस अन कोरोना जाईल काय? कोल्हापूर जिल्हा पावसाने अन कोरोणाने हैरान

 


 तेऊरवाडी - एस. के. पाटील / सी. एल. वृत्तसेवा 

         सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? हे बालगीत सर्वांच्याच परिचयाचे आहे. पण सध्या कोल्हापूर जिल्हयात रोजच पाऊस पडत असल्याने व कारोना वाढून शाळाही बंद झाल्याने सांग सांग भोलानाथ, पाऊस अन कोरोना जाईल काय? असे म्हणण्यांची वेळ सर्वावर आली आहे. 

        मे महिना आला की प्रचंड तापमामात वाढ. सर्वत्र कडक उन्हाळा. पण या वर्षी चित्र पालटले आहे. जिल्हयात रोज वादळी वारा व गारासह पावसाची हजेरी चालू आहे. कधी सकाळी सकाळी तर कधी दुपार नंतर वादळ पावसाची धुमशान चालू आहे. हवामान खात्याने तर पुढील पाच दिवस तरी पाऊस पाण्याचा अंदाज वर्तवला आहे. कागल तालुक्यात तर मागील आठवड्यात गारांचा खच पडून काही वेळासाठी प्रति काश्मिरचीच निर्मीती झाली होती. सततच्या पावसाने हवेत मे महिन्यात सुद्धा कमालिचा गारठा निर्माण झाला आहे.  हा वळवी पाऊस शेती मशागतीला उपयुक्त असला तरी सुद्धा मानवी आरोग्याला अपायकारक आहे. सध्या  कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचे थैमान चालू आहे. या मध्येच हा पाऊस म्हणजे कोरोना रूग्ण वाढीस पोषक वातावरण. जोरदार पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळावी अशी स्वप्ने रंगवणाऱ्या सर्व विद्यार्थी वर्गालाही हा पाऊस नकोसा झालाय. कारण पाऊस व  गारा पडत असल्या तरीही पावसात भिजायची अजिबात परवानगी नाही. काऱण एकच - कोरोना त्यामूळे बालचमूना हवा-हवासा वाटणारा पाऊस नकोसा झालाय. म्हणूनच जे गाणे सर्वांच्या आवडीचे होते, तेच आता नावडते झाले असून सांग सांग भोलानाथ - पाऊस व कोरोन जाईल काय? अशी म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे.



No comments:

Post a Comment