कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांचेकडून आरोग्य उपकेंद्रास औषधसाठा देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांचेकडून आरोग्य उपकेंद्रास औषधसाठा देणगी

आरोग्य केंद्रास औषधे देणगी देताना कानोली मुंबईंकर ग्रामस्थ

आजरा / प्रतिनिधी  (पुंडलिक सुतार)

        शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना  दिसत आहे. कानोली (ता. आजरा) सह पंचक्रोशीत गेले महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहताना दिसून येत असून लोकांच्यात भीतीचे वातावरण  निर्माण झाले आहे. म्हणूनच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे आरोग्य उपकेंद्रास जाणवत असलेल्या व्हिटॅमिन व रोगप्रतिकार शक्ती वाढीच्या गोळ्या तसेच विविध उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

     सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व या कठीण काळात आवश्यक औषध साठा उपलब्ध करून दिलेबद्दल मुंबई मंडळाच्या  सर्व पदाधिकारी व सदस्यांचे तंटामुक्त अध्यक्ष रमेश भोगण यांनी आभार मानले.

      या कार्यक्रमास यावेळीअध्यक्ष मनोहर सावरतकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत आपगे, सदस्य गोपाळ भोगण, विजयकुमार पाटील यांच्यासह आरोग्य विभाग कर्मचारी, सरपंच राजेंद्र मुरकुटे, ग्रामसेविका नाईक, ग्रा. पं. सदस्य शिवाजी पाटील यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.No comments:

Post a Comment