अडकूर येथे स्वखर्चाने सॅनिटायझरची फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

अडकूर येथे स्वखर्चाने सॅनिटायझरची फवारणी

अडकूर गावात सॅनिटायझर फवारणीचा शुभारंभ करताना सुरेश दळवी, अभय अडकूरकर व इतर.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         अडकुर  (ता. चंदगड) येथे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या कोरोणा रुग्णांचा  वाढती संख्या  लक्षात घेऊन अडकूर चे सुपत्र व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे  सेक्रेटरी सुरेश दळवी, मधुकर दळवी आणि अनिल कृष्णराव रेंगडे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत अडकुरच्या सहयोगाने संपूर्ण अडकुर गावात आज सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

       मागील वर्षी अडकूर गाव कोरोणा हॉट-स्पॉट बनले होते. अगदी त्याच प्रमाणे या वर्षी पण येथे ४० हून अधिक रूग्ण संख्या झाली आहे. वाढत्या रुग्णांचा धोका ओळखून अडकूर बाजारपेठ पाच दिवस लॉक डाऊन करण्यात आली आहे. तर आज संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.                       

   याप्रसंगी फवारणीची सुरुवात करताना प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी सुरेश दळवी, पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई अडकुरकर, मधुकर दळवी, कृष्णराव रेंगडे, ग्रामसेवक श्रीकांत सोनार, शिवराज देसाई, माजी उपसरपंच गणेश दळवी, सुजीत आर्दाळकर, नितीन दळवी, गणपत आर्दाळकर, धोडींबा कांबळे, महादेव शिवणगेकर, सुनील देसाई, विवेक रेंगडे, सुरेश पवार आणि ग्रामपंचयातीचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. जनतेने मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन संपुर्ण गावात करण्यात आले.No comments:

Post a Comment