कोविड पॉझिटिव्ह रुग्णासाठी कोवाड महाविद्यालयामार्फत मोफत मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

कोविड पॉझिटिव्ह रुग्णासाठी कोवाड महाविद्यालयामार्फत मोफत मार्गदर्शन


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता.चंदगड )च्यावतीने मानसशास्त्र विभागा मार्फत  फोन द्वारे चंदगड , आजरा , गडहिंग्लज , बेळगाव व खानापूर या तालुक्यांसाठी कोविड पॉझिटिव्ह रुग्णासाठी विनामूल्य/ मोफत मानसशास्त्रीय काउन्सलिंग सेवा  चालू करण्यात आली आहे.

      कोव्हिड-१९  जागतिक महामारीच्या पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेने  संपूर्ण जगाची, विशेष करून भारताची अक्षरश: झोप उडवून टाकली आहे. आताचा कोरोना विषाणू पूर्वीपेक्षा वेगळा व वेगाने अटॅक करणारा आहे. यात विशेष करून तरुण वर्गाचा मृत्युदर अधिक दिसून येतो. आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण व अभ्यास केला असता 

अतिरिक्त भीती व  ताणतणाव, 

असुरक्षिततेची भावना व नैराश्य,   माझं कसं होणार?

मी यातून बाहेर पडेन की नाही?

प्रचंड नकारात्मक विचार

ही मानसशास्त्रीय कारणे दिसून येतात. त्याचबरोबर बहुतांश मृत्यु हे रोगापेक्षा या विचारांपासून झाले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी खास कोरोना काळात मानसिक आधार देण्यासाठी महाविद्यालय व मनोवेध - मानसशास्त्रीय काउंसलिंग केंद्र, बेळगाव यांच्यावतीने  रोज सकाळी ठीक ११ ते २ या वेळेत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना विनामूल्य मानसशास्त्रीय काउंसलिंग सेवा फोनद्वारे डॉ. बी. एस. पाटील (Psychologist) देणार आहेत. यासाठी गरजू रुग्णांनी पुढील फोन नंबरवर संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क नं. 8971713131 व 9480422074 त्याबरोबरच विचार बदला म्हणजे जीवन बदलेल असा सल्लाही देण्यात आला आहे. कोवाड महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.No comments:

Post a Comment