आशा - गटप्रवर्तक यांचा सोमवारी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2021

आशा - गटप्रवर्तक यांचा सोमवारी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे , किमान वेतन द्यावे , यांसह विविध मागण्यांसाठी आशा - गटप्रवर्तक यांनी सोमवारी ( ता . २४ ) रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे . गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने या देशव्यापी संपाची हाक दिली आहे . राज्यात २४ जिल्ह्यात ३२ हजार महिला सहभागी होणार आहेत . आशा , गट प्रवर्तक यांना कोरोना काळात कायमस्वरूपी कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे ; परंतु त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही . याउलट त्यांना काही अधिकारी काढून टाकण्याची धमकी देत आहेत .काही ठिकाणी तर सर्वेक्षणाला गेल्यानंतर त्यांच्यावर अरेरावीचा प्रकार होण्याबरोबरच प्राणघातक हल्ले देखील होत आहेत . काही महिलांना कोरोनामुळे प्राणही गमवावे लागले असून , तरीही त्यांना शासनाकडून योग्य मोबदला दिला जात नाही . केंद्र आणि राज्य सरकार हे त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे . यामुळे देशव्यापी संपाची हाक दिली आहे . कोरोना महामारीत १२ तास काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे , किमान वेतन द्यावे , अशी मागणी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन सहसचिव नेत्रदीपा पाटील यांनी केली . यावेळी जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकांनी संपात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment