चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील तरुण उद्योजक डॉ .सुनिल कानेकर यांच्या सहकार्याने चंदगड व कानूर येथील कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णांसाठी आयुर्वेदिक काढ्याचे वितरण केले.यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते दिपक वडेर हे ही उपस्थित होते.चंदगड चे तहसीलदार विनोद रणावरे वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.काढ्याबाबतची व वापराची माहिती यावेळी काणेकर यांनी दिली.गेल्या वर्षी कोरोना काळ सुरू झाल्यापासून ते आज तागायत ते कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुर्वेद शास्त्रानुसार डॉ . चंद्रकात देसाई ( यादगुड ) यांच्या मार्गदर्शनानुसार विविध स्तरांवर न थांबता काम करत आहेत,प्रसंगी क़रोना रुग्ण उपचारासाठी असलेल्या ठिकाणी स्वता जावून भेट देवून रुग्णांना दिलासा देत आहेत,शांताई वृद्धाश्रम बेळगाव तेथेही जाऊन त्यांनी वृद्धाश्रम मधील नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा व योग मुद्रा कशा पद्धतीने वापर करावा याचेही त्यांनी मार्गदर्शन केले तसेच चंदगड शहरात काही वेळा दुर्दव्याने मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला सुध्दा ते पुढाकार घेत असल्याचे सांगितले जात आहे.सामाजिक प्रबोधन करण्यासाठी ते लाॅकडाऊन नसताना परगावी जावुन मार्गदर्शन करतात आयुर्वेदिक उपचार व खबरदारी बध्दल माहिती देत असतात एकंदरीत काणेकर यांच्या सहकार्यातून या कठीण काळात दिलासा मिळत आहे.
No comments:
Post a Comment