बेळगावच्या कलाकाराकडून विवेकानंदांना रांगोळी कलेतून आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2021

बेळगावच्या कलाकाराकडून विवेकानंदांना रांगोळी कलेतून आदरांजली

स्वामी विवेकानंदांची रांगोळी काढताना कलाकार अजित औरवाडकर व पूर्ण  रांगोळी कलाकृती.

कालकुंद्री : (विशाल पाटील) सी एल वृत्तसेवा

       वडगाव बेळगाव येथील अजित म. औरवाडकर या सुप्रसिद्ध रांगोळी कलाकाराने स्वामी विवेकानंद यांना १५८ व्या जयंतीनिमित्त रांगोळी कलेतून आदरांजली वाहिली आहे. २ बाय ३ फूट आकाराच्या रांगोळी साठी त्यांनी लेक कलरचा वापर केला आहे. यासाठी नऊ तास कालावधी लागला.  ही कलाकृती आज दिनांक १२ पासून दि. १५ जानेवारी पर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत औरवाडकर यांच्या ज्योती फोटो स्टुडिओ, नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, वडगाव बेळगाव येथे सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुली असेल.
       अजित यांनी यापूर्वी विविध औचित्य साधून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, वल्लभभाई पटेल, एपीजे अब्दुल कलाम, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, शहनाई वादक बिस्मिल्ला खान, नरवीर तानाजी मालुसरे, डॉक्टर श्रीराम लागू, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी आदींच्या रांगोळ्यांना कलाप्रेमी व नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

No comments:

Post a Comment