महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत उचंगी प्रकल्पासंदर्भात चर्चा करताना आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
उचंगी प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्न संदर्भात आमदार राजेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्थांना दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रकल्प ग्रस्तांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर मुंबई येथे बैठक घडवून आणली.
त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उचंगी प्रकल्प ग्रस्तांच्या वतीने कॉ.संजय तरडेकर, कॉ. संपत देसाई, उचंगी चे दिलीप देसाई , धरण ग्रस्तांचे नेते अशोक जाधव, तसेच पाटबंधारे विभागाचे सचिव श्री मुंडे , बाळासाहेब देशमुख, व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपजिल्हाधिकारी अशोक पवार , एस . ई . सुर्वे , प्रांताधिकारी संपत खिलारी , पुनर्वासन अधिकारी जिरंगे मॅडम यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या बैठकीमध्ये प्रकल्प ग्रस्तांच्या निर्वाह क्षेत्राबाबत निर्णय होणे,65% रक्कम भरून घेण्याबाबतीत निर्णय होणे, त्याचबरोबर 2 मिटर ने उंची वाढविल्यास चाफवड्यातील 150 घरे धोक्याची पातळी जवळ येत असल्याकारणाने त्यांचे खास बाब म्हणून संपादित करण्याबाबत निर्णय होणे, व उचंगी गावातील स्वईच्छा पुनर्वसन स्वीकारलेल्या प्रकल्प ग्रस्तांना वाढीव मोबदला देणे बाबतीत सहानभूतीपूर्वक शासनाने विचार करण्याबाबत चर्चा झाली.
नामदार जयंत पाटील यांनी तातडीने उचंगी लुघुपटबंधारे प्रकल्प पूर्ण होण्याकरिता पुनर्वसनाचे प्रश्न समजवून घेण्याकरिता सोमवारी दिनांक 24/05/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बैठक लावण्याची सूचना केली.व सदर बैठकीस जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी , प्रांताधिकारी, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून जून महिन्यामध्ये शासन स्तरावरती पाठपुरवठा करून योग्य तो निर्णय कायदा व नियमानुसार प्रकल्प ग्रस्तांना न्याय देऊ अशी आमदार राजेश पाटील व सर्व प्रकल्प ग्रस्तांना आश्वासीत केले.
No comments:
Post a Comment