शेतकऱ्यांच्या काजूला योग्य दर मिळावा - शेकापचे विजयभाई पाटील यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2021

शेतकऱ्यांच्या काजूला योग्य दर मिळावा - शेकापचे विजयभाई पाटील यांची मागणी

           


 
चंदगड / प्रतिनिधी

     यंदाच्या हंगामात गेल्या वर्षा प्रमाणेच काजू पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कोरोना महामारी मुळे तर अगोदरच जनजीवन विस्कळित झाले आहे. काजू हंगामात यंदा काजूचे उत्पादन ही अल्प प्रमाणात झाले. पण मे महिन्याचा अखेरचा आठवडा जवळ येत असता शेतकऱ्यांना या हंगामातील काजू पिकाची उचल व दराची स्थिती पाहता काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटाका बसत आहे. काजू व काजू च्या दराबाबत शासनाने लक्ष घालावे व शेतकऱ्यांना चांगला दर देवून दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन पत्र शेकापचे विजयभाई पाटील यांनी दिले आहे.                                    

      पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकासमंत्री हसनसो मुश्रीफ, ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर, तसेच दोन्ही खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शेकापचे आर. एम. गावडे, नामदेव जाधव, सुरेश पाटील, निवृती पाटील, मोहन चिमणे, नारायण कांबळे, धोंडिबा गावडे, प्रकाश पाटील, अश्र्विन पाटील व इतर काजू उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन पाठवले आहे.No comments:

Post a Comment