अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक साहित्याची देणगी, अडकुर आणि परिसरातील तरुणांचा सामाजिक उपक्रम, सोशल मिडियाचा सदुपयोग - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2021

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक साहित्याची देणगी, अडकुर आणि परिसरातील तरुणांचा सामाजिक उपक्रम, सोशल मिडियाचा सदुपयोग

अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक साहित्याची देणगी देताना सुरेश दळवी, संग्रामदादा दळवी, शिवाजी देसाई व इतर ग्रामस्थ.

अडकूर  / सी. एल. वृत्तसेवा

      अडकुर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी या हेतूने  थंड, गरम शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मशीन, बसण्यासाठी लाकडी बाकडी व पॅरासिटीमोल गोळ्या भेट अडकुर  परिसरातील तरुणांनी मानवतेचे दर्शन घडवले. तसेच कोरोनाचा या संकटकाळात उदारतेने आपल्या परीने देणगी देऊन एक चांगल्या कामाला साथ दिली.

         सर्वत्र कोरोनाचे थैमान चालू आहे. अडकूर गावपन कोरोणाचा हॉट स्पॉट आहे. येथील आरोग्य केंद्रात रोज ३०० हून अधिक विविध रुग्ण येत असतात. यामुळे या आरोग्य केंद्रामध्ये कोणात्या  गोष्टींची कमतरता आहे यासंदर्भात या युवकांनी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्राला सध्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी देण्याचे ठरले. लगेच या युवकांनी `राजे शिवछत्रपती` व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केले. त्याला अनेकांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याने निधी जमवला. जमलेल्या निधीतून  दवाखान्याला थंड, गरम आणि नॉर्मल शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मशीन (Water Despenser), तसेच रूग्णांना व लसिकरणासाठी येणाऱ्या ना बसण्यासाठी पाच लाकडी बाके आणि लस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या  Paracetamol च्या 5000 गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ यांचेकडे दिनांक २० मे २०२१  रोजी देण्यात आले. या सेवाभावी कार्यात तरुणांनी  ज्या पद्धतीने सहभाग घेतला ते कार्य  निश्चितपणे कौतुकास पात्र आहे. चांगल्या कामासाठी तरुण पिढी सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होते हे दिसून आले.

       यावेळी उपरोक्त साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ यांच्याकडे सुपूर्त करताना प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी सुरेश दळवी, ग्राहक संरक्षण परिषद समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  संग्रामदादा देसाई अडकुरकर, तरुण पदाधिकारी शिवराज देसाई, सामाजिक कार्यकर्ते संदीप आर्दाळकर, मनोज परीट,संदीप देसाई, अभिजित देसाई, सुभाणा गुरव,सुरेंद्र आर्दाळकर,दिलीप भेकणे आदी उपस्थित होते.

         याप्रसंगी यापुढेही समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाला सहकार्य करीत राहण्याचे  या तरुणानी जाहिर केले. या युवकांच्या अमुल्य अशा दातृत्वाचा इतर युवकांनीही बोध घेतल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास निश्चीतच मदत होईल.

           मदत केलेल्यांची नावे - उमेद सेवा फाउंडेशन (NGO)( दयानंद सटूप्पा अर्दाळकर) (गणुचीवडी), दिलीप दत्तात्रय इंगवले (मुंबई), संदीप विंजनेकर (विंजने), युनिटी फाऊंडेशन अडकुर, दिनकर भादवणकर (गणुचीवाडी), श्री सुरेशदादा दळवी, श्रीधर अर्दाळकर (गणुचीवडी), संग्रामदादा अडकुरकर, जॉन्सन जुवाव गॉडद (मुंबई), सचिन वसंत घोरपडे (पुणे).

             अनिल पवार (विंझने), संदीप नेवरेकर (आजरा परोली), डॉ. विशाल देसाई, मनोज सोनबा परिट, प्रकाश अनिल शिंदे (पुणे), संदीप हरिभाऊ आर्दाळकर, शिवराज गोपाळराव देसाई, पुंडलीक भिकले (बोंजुडी), अभिजित जगन्नाथ इंगवले (मुंबई), महेश शंकर देसाई (पुणे), दिलीप बाळा साहेब सावंत (कल्याण मुंबई), सचिन पाटील (विद्युत मंडळ), बकश जमादार, अभिजित भोसले, लहू इंगवले (मुंबई), रामदास गावडे, जितेंद्र बाळासाहेब सावंत (कल्याण मुंबई), जितेंद्र भाऊसाहेब देसाई, प्रकाश आबासो कदम देसाई (मुंबई), महेश गोपाळ अंबिटकर, सागर दद्दीकर (पुणे), मोहन वाईंगडे (गणूचीवडी), उत्तम पांडुरंग देसाई, निवृत्ती घेवडे (मोरेवाडी), अरुण संभाजी शिवंगेकर, सचिन आपटेकर (उस्ताळी), शंकर हिंडगावकर, अभिजित आंबिटकर.

         रणजित सुरेश आर्दाळकर, सुभाणा गुरव, अभिजित दिनकर देसाई, संदीप राजाराम देसाई, अतुल देसाई, सुरेंद्र अर्दाळकर, सुनील निकम (मुंबई), आनंद भोसले, वैभव पाटील (कार्वे), सुशांत परीट, अमृत पांडुरंग देसाई, परशराम मटकर (उत्साळ) आदीसह अडकूर व परिसरातील ग्रामस्थांनी याकामी सहकार्य केले. 

                                


No comments:

Post a Comment