लॉकडाऊनचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिस.
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोरोना या रोगाच्या संसर्गामुळे होत असलेली वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाकडून शनिवार दिनांक १५ मे २०२१ रोजी रात्री १२.०० वाजलेपासून ते रविवार दिनांक २३ मे २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचे नियमांचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बंदोबस्ताकामी अहोरात्र तैनात असून दिनांक १५ मे २०२१ रोजीपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिनांक १७ मे २०२१ रोजी साय्काल्ही ०६.०० वाजेपर्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येवून त्यांचेविरुध्द पुढीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयातील पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण ४२० इसमांवर कारवाई करून त्यांचेकडून एकूण रक्कम १,१२,७००/ - रु. इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या इसमांच्यावर एकूण ११३८ केसेस दाखल केल्या असून त्यांचेकडून एकूण रक्कम १,६६,३०० /- रु. इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक वाहन घेवून फिरणारे ३२० इसमाचेकडील ३२० वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५३ आस्थापनावर कारवाई करून त्यांचेकडून एकूण रक्कम ६८,७००/- रु. दंड वसूल करण्यात आलेला आहे. १७४ मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचेकडून एकूण रक्कम ७२,४००/- रु. दंड वसूल करण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. पोलीस प्रशासन कडकपणे अंमलबजावणी राबविणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहेत.
No comments:
Post a Comment