लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर चंदगड पोलिसांकडून कारवाई, हजारो रुपयांचा दंड वसुल, वाहने जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2021

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर चंदगड पोलिसांकडून कारवाई, हजारो रुपयांचा दंड वसुल, वाहने जप्त

 


चंदगड / प्रतिनिधी

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात लॉकडाऊन आहे. या आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर चंदगड पोलिसांनी कारवाई करुन अनेक वाहने जप्त केली. तसेच हजारो रुपयांचा दंड वसुल केला. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशान्वये १६ ते १७ मे २०२१ या कालावधीत चंदगड तालुक्यात अत्यावश्यक वाहने वगळता इतर कोणत्याही वाहनांना फिरण्यास बंदी आहे. या नियमभंग करणारे नागरीक व वाहनांच्यावर चंदगड पोलिसांनी कारवाई केल्याची माहीती चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बी. ए. तळेकर यांनी दिली. 

चंदगड शहर 

विदाऊट मास्क- 04 दंड 2000

आस्थापना -01 दंड 1000

जप्त वाहन-12

मोटार वाहन केसेस-07 दंड 1700


 कोवाड दुरक्षेत्र 

विदाऊट मास्क- 05 दंड 2500

जप्त वाहन-16


 पाटणे फाटा चौकी

विदाऊट मास्क- 32 दंड 16000

जप्त वाहन- 7

मोटार वाहन केसेस-16 दंड 3200


 तिलारी दुरक्षेत्र

विदाऊट मास्क- 01 दंड 500

जप्त वाहन-02

मोटार वाहन केसेस-01 दंड 400


 अडकुर बिट 

विदाऊट मास्क-04 दंड 2000

जप्त वाहन-02

वाहनावर गुन्हे दाखल- 2 


 एकूण कार्यवाही 

 विदाऊट मास्क- 46 केसेस   दंड 23000 

 आस्थापना -01 दंड 1000 

 जप्त वाहन-39 

 मोटार वाहन केसेस- 24 दंड 5300 

 मोटार वाहन गुन्हे दाखल -02 


        लॉकडाऊन काळात नागरीकांनी अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडू नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली जाईल. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्ती करुन गुन्हे दाखल केले जातील. आतापर्यंत विनाकारण वाहन घेऊन बाहेर फिरणाऱ्यांची 93 वाहने ताब्यात घेतली आहेत. सदरची वाहने 02 जून 21 रोजी संबंधितांना परत करणार असल्याचे पो. नि. श्री. तळेकर यांनी सागितले. 




No comments:

Post a Comment