जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची चंदगड रूग्णालयाला भेट - कोरोना स्थितिचा घेतला आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची चंदगड रूग्णालयाला भेट - कोरोना स्थितिचा घेतला आढावा

 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चंदगड रूग्णालयाला भेट देऊन कोरोना स्थितिचा घेतला आढावा.

चंदगड / प्रतिनिधी

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी आज चंदगड येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन तालूक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला, तसेच ग्रामीण रूग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी जागेची पहाणी केली.यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर,तहसिलदार विनोद रणवरे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई यानी कोरोना आढावा घेताना उपलब्ध बेडची माहिती घेतली,रुग्णांची काळजी घेण्याची सुचना करून ऑक्सिजन उपलब्ध करून इमर्जन्सी साठी कोठा शिल्लक ठेवण्यास सांगितले. चंदगड येथे ग्रामीण रूग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी जागेची पहाणी केली, कानूर व स्टिफन इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये सूरू असलेल्या कोव्हिड सेंटरची पहाणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ आर.के खोत,डाॅ एस एस साने, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, अभियंता संजय सासणे,आदी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment