खत, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

खत, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

                   केंद्र सरकारच्या खत, इंधन दरवाडी विरोधात आंदोलन करताना ए. वाय. पाटील, आर. के. पोवार व इतर.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसंस्था

       कोल्हापुर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेसअनुसरून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, केडीसीसी बॅक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हाकार्याध्यक्ष अनिल साळोखे, अदिल फरास  यांच्या नेतृत्वाखाली  केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची झालेली  भरमसाठ दरवाढ, तसेच नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली 40% दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. शेतकऱ्यांचा एकच नारा रासायनिक, खतांची दरवाढ कमी करा, किसानो के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे"  महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल, मोदी हटओ किसान बचाओ,"बेशरम मोदी होश मे आओ जनता से तुम ना टकराओ" असे नारे देत केंद्र सरकारचा शेती व शेतकरी विरोधी धोरणा विरोधात निषेध करून प्रातिनिधीक स्वरूपात आदोंलन करण्यात आले.

            केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती 40%  नी वाढविल्या. त्यामुळे मागील एक वर्षयंपासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचे काम केले आहे. ही दरवाढ तात्काळ कमी करण्याच्या मागणी साठी केंद्र सरकार विरोधात  निषेध करण्यात आला. यावेळी युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, मधुकर जांभळे, विधार्थी शहराध्यक्ष प्रसाद उगवे, युवराज वारके, विधार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, संजय कु-हाडे, सुहास साळोखे, संजय पडवळे, रमेश पोवार, जयकुमार शिंदे, किसनराव कल्याणकर  यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment