चंदगड नगरपंचायतीच्या शववाहिकेचे सेवा भावतत्वावर लोकार्पण. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीला मिळालेल्या शववाहिका आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाली.कोल्हापूर येथील जीवन मुक्ती संघटनेने सेवाभाव तत्वावर हि शववाहिका चालवणेस घेतली आहे. नगराध्यक्षा सौ प्राची काणेकर नगराध्यक्ष सौ प्राची काणेकर यांनी व्हाईट आर्मी संचालित जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष अशोक लक्ष्मण रोकडे यांचे कडे शववाहिकेची चावी सुपूर्द केली. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक ॲड. विजय कडूकर, सचिन नेसरीकर, अभिजित गुरबे, विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर, आनंद हळदणकर, रोहित वाटगी, झाकीर नाईक सौ अनिता परीट, अनुसया दाणी, नेत्रदिपा कांबळे, संजय चंदगडकर, श्रीकृष्ण दाणी, कलीम मदार, व्हाईट आर्मी प्रतिनिधी विनायक भाट, कृष्णात भेंडे गजानन सुतार, कस्तुरी रोकडे श्रीपाद सामंत, विशाल परब, अजय सातर्डेकर, पांडुरंग माईनकर, किरण येरुडकर, हीना नाईक, संपदा प्रबळकर, स्नेहा हवालदार श्रेया बांदेकर, सुनील रेगडे, परशुराम बामणे, नगरअभियंता ऋषिकेश साबळे, वरिष्ठ लिपिक संतोष कडूकर, आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
चंदगड नगरपंचायतीची ही शववाहिका चंदगड शहरासाठी निशुल्क असून चंदगड शहराबाहेर २० किलोमीटर अंतरापर्यंत रुपये ५०० रूपये तर २० किलो मिटरच्या पूढील प्रती किलो मीटर १५ रु प्रमाणे शववाहिका भाडे सेवाभावतत्वावर भाडे आकारण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment