अग्निशमन वाहिकेसाठी चंदगड नगरपंचायतीला ४०लाखांचा निधी मंजूर - नगराध्यक्षा सौ. काणेकर - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2021

अग्निशमन वाहिकेसाठी चंदगड नगरपंचायतीला ४०लाखांचा निधी मंजूर - नगराध्यक्षा सौ. काणेकर

नगराध्यक्ष प्राची काणेकर


चंदगड / प्रतिनिधी 

        पालकमंत्री सतेज पाटील यांच्या  प्रयत्नाने चंदगड नगरपंचायतीला अग्निमन वाहिकेसाठी ४० लाख रुपये अनुदान मंजूर झाल्याची माहिती  नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी दिली. 

      चंदगड शहरात अग्निशामन वाहिकेची नितांत गरज होती. नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी गेल्या ८ एप्रिल रोजी पालकमंत्र्यांकडे अनुदानाची मागणी करणारे पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. प्राची काणेकर यांच्या प्रयत्नांना यश येऊन जिल्हा नियोजन वार्षिक योजनेत ४० लाखांची तरतूद करण्यात आली. ३१मार्च २०२२ पर्यंत हा खर्च नगरपंचायतीने करणे बंधनकारक आहे. चंदगड नगरपंचायतीच्या अशिमन वाहिकेसाठी ४० लाखांचे अनुदान मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी चंदगड नगरपंचायतीला पाठवले आहे. चंदगडच्या शिवछत्रपती स्मारकासाठीही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी २० लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात ६० लाखांची नवी कामे मंजूर झाली आहेत. नगराध्यक्ष प्राची काणेकर व नगरसेवकांनी  दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
No comments:

Post a Comment