सुप्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2021

सुप्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर यांना पितृशोक

 

पैगंबरवासी हुसेन इमाम मुजावर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 महागाव (ता. गडहिंग्लज) येथील प्रखर हिंदुत्ववादी व्याख्याते, शिवसेना गडहिंग्लज तालुका संघटक व शिवसेना पक्षाची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे अखलाक भाई मुजावर यांच्या वडिलांचे १० मे २०२१ रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकार व वृद्धापकाळाने निधन झाले. पै. हुसेन इमाम मुजावर वय ८५ हे जि. प. शाळेचे सेवानिवृत्त उर्दू शिक्षक व उर्दू भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर महागाव दफनभूमीत अंत्यसंस्कार प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अप्पी पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment