![]() |
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवताना होनेवाडीतील युवक. |
आजरा प्रतिनिधी / पुंडलिक सुतार
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शांततेत निघालेले ५८ मूकमोर्चे तसेच ४२ मराठा युवकांनी या न्यायहक्कसाठी दिलेले बलिदान या सर्व गोष्टींना तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले. या निर्णया बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत होनेवाडी ता.आजरा येथील राजर्षि शाहू व्यायाम शाळेच्या जवळ जवळ २५ कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव त्यात शासनाने घालून दिलेल्या नियम अटी शर्तीचे पालन करत लोकशाही मार्गाने नाराजी नोंदवत मराठा समाजाची एकजूट आजूबाजूच्या पंचक्रोशीसह सर्वच गाव खेड्यानी दाखवावी असे आवाहन ही व्यायाम शाळेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले आहे. यावेळी होनेवाडी गावातीत मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment