हलकर्णी येथील डाॅ. संदेश गायकवाड योगासन स्पर्धेत देशात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2021

हलकर्णी येथील डाॅ. संदेश गायकवाड योगासन स्पर्धेत देशात प्रथम

डाॅ. संदेश गायकवाड

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवासी डॉ. संदेश लक्ष्मण गायकवाड याने आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळवला.आग्रा येथील एस.आर.एस आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर या योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते.डाॅ.संदेश याला गडहिंग्लज येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असताना त्याला योगाचे प्रशिक्षण मिळत गेले. तर या स्पर्धेत राजस्थानच्या गरिमा कौशिक हिने द्वितीय क्रमांक आणि मध्यप्रदेशच्या शिखा सिंग हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

No comments:

Post a Comment