कोरोनाच्या महामारीत सर्वाची मानसिकता बिघडली, कोरोना काळातील आरोग्य संवर्धन' विषयावर मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2021

कोरोनाच्या महामारीत सर्वाची मानसिकता बिघडली, कोरोना काळातील आरोग्य संवर्धन' विषयावर मार्गदर्शन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           कोरोनाच्या महामारीत ताणतणाव वाढला असून रुग्णांसाह घरच्यांचीही मानसिकता बिघडली आहे. त्यात लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, छंद जोपासा, सकारात्मकता हीच कोरोनाविरुद्धची यशस्वी लढाई असल्याचे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले.हलकर्णी ता.चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अयोजिक केलेल्या ऑनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानमालेत 'कोरोना काळातील आरोग्य संवर्धन' या विषयावर त्या बोलत होत्या.

           प्रारंभी डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे स्वरूप सांगितले. 

        डॉ. वंदना गुरव पुढे म्हणाल्या स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात अधिक काळासाठी उपाशी राहू नका. त्यामुळे भरपूर खायला हवे, ताजे जेवण घ्या. मला आजाराला हरवण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच तुम्ही यशस्वी व्हाल. कोरोनाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप महत्वाची असून त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर रहा आणि धीट बना असा सल्लाही यावेळी डॉ. गुरव यांनी यावेळी दिला.यावेळी प्र.प्राचार्य प्रा. पी.ए पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी.एल. तेली यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार डॉ. जे.जे व्हटकर यांनी मानले.



No comments:

Post a Comment