यावर्षीही मुलांशिवाय शाळा सुरु, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा श्रीगणेशा - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

यावर्षीही मुलांशिवाय शाळा सुरु, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा श्रीगणेशा

डुक्‍करवाडी येथील बागीलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज.

माणगाव (राजेंद्र शिवणगेकर) 

        नवीन गणवेश, नवीन पुस्तके ,वह्या ,दप्तर , नवे मित्र मैत्रिणी , ढोलताशांचा आवाज , मिरवणूक आणि शाळेच्या पहिल्या दिवशी फुलं देऊन झालेलं स्वागत. या गोड समारंभाला मुकले. हे कोरोनाच्या दोन्ही लाटेत वाहून गेलं. आणि सगळं स्वप्नवत राहिलं.

      आज १५ जून सन न०२१-२०२२  या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. पण मुलांशिवाय .मार्च २०२० पासून कोरोना महामारी ने जगभर धुमाकूळ घातला आहे. या प्रसंगातून आपण सर्वजण जात आहोत अशा  परिस्थितीत वाटचाल करीत असताना अनेक अडचणी येत आहेत.या वर आपण निश्चिंत पणे मार्ग काढाल. शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.या शैक्षणिक वर्षात नवनवीन ऑनलाईन उपक्रम राबवून विद्यार्थ्थ्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर येऊन पडली आहे. झालेल्या शैक्षणिक नुकसानिकवर विद्यार्थी, शिक्षक, पालक कशी मात करतात हे काळच ठरवेल.

        महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आज पासून चंदगड तालुक्यात शाळा सुरू होत आहेत .शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी घरीच राहणार आहेत आणि शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करायचे आहे .शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर घेत आहेत त्याचबरोबर मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अभ्यासापासून दूर जाऊ नये यासाठी  शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व शाळांमध्ये कामकाज सुरू आहे .इयत्ता दहावीचा निकाल देण्याचे काम सुरू असल्याने आज पहिल्याच दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून आपल्या कामकाजाची सुरुवात केली आहे .सर्व प्राथमिक शाळा सुट्टीनंतर पुन्हा सॅनिटायझर मारून शुद्धीकरण करण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागत आहे. चंदगड सारख्या ग्रामीण भागात शाळेमधून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना पालक भेट घेऊन विद्यार्थी आपल्या शाळेत येण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. यासाठी विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 




No comments:

Post a Comment