नेसरीत आधार अलगिकरण सेवा केंद्राचे आमदार राजेश पाटीलांच्या हस्ते उदघाटन, कोरोना योद्धा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

नेसरीत आधार अलगिकरण सेवा केंद्राचे आमदार राजेश पाटीलांच्या हस्ते उदघाटन, कोरोना योद्धा सत्कार

आधार अलगिकरण सेवा केंद्राचे उदघाटन प्रसंगी आमदार राजेश पाटील, शेजारी प्रातांधिकारी विजया पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर आदी.

नेसरी /सी. एल. वृत्तसेवा

          कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत कोरोना बाधीतांना आधार केंद्रेच मदतीचा आधार बनत आहेत असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले. येथे  जिल्हा परिषद कोल्हापूर व नेसरी ग्रामपंचायत संचलित जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर यांच्या फंडातून  नेसरी ग्रामपंचायत व लोकसहभागातून  कन्या विद्या मंदिर शाळेत उभारलेल्या २५ बेडचे आधार अलगिकरण सेवा केंद्र उद्घाटन प्रसंगी  आमदार पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय प्रातांधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            पुढे बोलताना आमदार श्री पाटील म्हणाले, अभ्यासू व्यक्तिमत्व हेमंत  कोलेकर यांनी अलगीकरण केंद्राची निर्मिती केल्यांने कोरोना रूग्णांची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे. गटा-तटाचे राजकारण न करता आम जनतेचा प्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील प्रश्न सोडविले जातील. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आधार सेवा केंद्राला सर्वतोपरी मदत केली जाईल. 

        प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर म्हणाल्या, ``कोरोना महामारीत माणसाला आधार देण्याची गरज आहे. संवेदनशीलतेच्या माध्यमातून कोरोना रूग्णांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना मानसिक आधार दिला तर तो लवकर बरा होतो. आधार सेवा केंद्र गडहिंग्लज, आजरा, चंदगड तीन्ही तालुक्यांच्या तोंडावर उभे असल्यांने नागरिकांची चांगली सोय होणार आहे. अॅड. कोलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविकात आधार अलगीकरण सेवा केंद्राचा उद्देश स्पष्ट करून केंद्राचे महत्व विशद केले. 

          यावेळी कोरोना  योद्धा डाॅ. हर्षद वसकले, डाॅ. निलेश भारती, डाॅ. टी. एच. पाटील, डाॅ. झेवियर डिसोझा, डाॅ. सत्यजित देसाई, डाॅ. विश्वजीत शिंदे, कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नसिम मुजावर, सर्जेराव रणदिवे, पत्रकार, आशा, अंगणवाडी, आरोग्य  सेविका, यांचा मान्यवरांच्या हस्ते  सत्कार झाला. 

          उपसरपंच अमर हिडदुगी, तावरेवाडी सरपंच दिनकर वळतकर, सरोळी सरपंच मारुती पाटील, सावतवाडी तर्फ नेसरी सरपंच धोंडीबा नांदवडेकर, शिप्पूर तर्फ नेसरी सरपंच बाबूराव शिखरे, तारेवाडी उपसरपंच युवराज  पाटील, बिद्रेवाडी उपसरपंच  राजेंद्र नाईक, महादेव साखरे, अभयकुमार देसाई, तानाजी गडकरी शिवाजीराव हिडदुगी, माजी सरपंच वैशाली पाटील, अशोक पांडव, कार्तिक कोलेकर, शंकर नाईक, ग्रामविकास अधिकारी परशराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अब्दुलरौप मुजावर, रणजित पाटील, तुकाराम नावलगी, नागोजी कांबळे, रामचंद्र परिट, अमृता बागडी, पदमजा देसाई, मंगल जामुने, रत्नप्रभा  कोलेकर, शाहजादबी नाईवाडी, अनिता मटकर, ज्योती देसाई, गोविंद नांदवडेकर, शाम नाईक, दत्ता बागडी आदी उपस्थित होते. संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच आशिषकुमार साखरे यांनी आभार मानले.

           नेसरी ग्रामीण रूग्णांलयामध्ये ५० बेड मागणी 

           नेसरी ग्रामीण रूग्णालय सध्या येथे २५ बेडचे आहे लवकरच ५० बेडचे व्हावे यासाठी कोल्हापूर दौ-यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. 

No comments:

Post a Comment