नंदकुमार ढेरे यांना 'आचार्य अत्रे- उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2021

नंदकुमार ढेरे यांना 'आचार्य अत्रे- उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार जाहीर

नंदकुमार ढेरे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

         चंदगड तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष  नंदकुमार ढेरे (रा. डुक्करवाडी (रामपूर), ता. चंदगड) यांना कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा मानाचा आचार्य अत्रे तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. 

        दैनिक लोकमतच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांना प्रसिद्धी व तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून नंदकुमार ढेरे गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे करत आहेत. याच बरोबर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून  पत्रकारांच्या समस्या सोडविण्या बरोबरच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारे व्यक्तिमत्व म्हणून नंदकुमार ढेरे यांच्याकडे पाहिले जाते. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कामगिरीची दखल घेत त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार पत्रकार संघ व तालुक्याची शान वाढवणारा आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



No comments:

Post a Comment