झांबरे येथे गोवा बनावटीची मुद्देमालासह सहा लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसाची,कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2021

झांबरे येथे गोवा बनावटीची मुद्देमालासह सहा लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसाची,कारवाई

 

गोवा बनावटीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलेली व्यक्ती.

चंदगड/प्रतिनिधी 

     झांबरे ता.चंदगड येथे तळकट( सिंधुदुर्ग) या मार्गाने गोवा बनावटीची मुद्देमालासह ५,९५,१६० दारू पकडली.चंदगड पोलीसानी सापळा रचून ही कारवाई केली. सतिश उर्फ चिमाजी आर्दाळकर (रा.अडकूर ता.चंदगड) असे या प्रकरणी ताब्यात घतलेल्या युवकाचे नाव आहे.

तळकट ( सिंधुदुर्ग ) मार्गे झांबरे ता.चंदग आडकुर गावी गोवा बनावटीच्या दारूची चोरून वाहतूक करणार आहे. अशी माहिती चंदगड पोलिसाना मिळाली,त्यानुसार  झांबरे ता.चंदगड गावातील रवळनाथ मंदिराच्या बाजूस असणारे रस्त्याकडेला चंदगड कडे चारचाकी सुमो गाडी नं एम एच१२ए एन.८६२१ येताना दिसताच. गाडीला थांबवून  तपासणी केली असता त्या मध्ये गोल्डन कंपनीचे ३७बाॅक्स किंमत ( १,९९,८००) गोल्डन आईस ब्लू व्हिस्की चे ९बाॅक्स किंमत व सुमो गाडी (नं MH-12-AN-8621)किंमत ३,५०,००० असा एकूण ५,९५,१६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकून त्याची विक्री करणे करिता वाहतूक करत असताना पकडला.अधिक तपास पो.हवालदार महेेेेश  बांबळे ह करत आहेत.
No comments:

Post a Comment