राजवीर मगदूम राज्यस्तरीय कोरोना संदेशदुत पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2021

राजवीर मगदूम राज्यस्तरीय कोरोना संदेशदुत पुरस्काराने सन्मानित

राजवीर मगदूम
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

          विद्यार्थी गुणवत्ता मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना जनजागृती करीता कोरोनामुक्ति संदेशदुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आभासी पद्धतीने नुकताच संपन्न झाला. केंद्रीय प्राथमिक शाळा नागनवाडी (ता. चंदगड) येथील विद्यार्थी राजवीर निलम प्रशांत मगदूम याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

       सदर स्पर्धेमध्ये घोषवाक्य, चित्रकला, शार्ट फिल्म, कविता याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांनी कोरोनामुक्तीचा संदेश राज्यभर युट्युबच्या माध्यमातून सत्तावन हजार लोकापर्यंत पोहचविला आहे. राज्यभरातून या आभासी पद्धतीने सोहळा स्पर्धेकरिता एकूण ६० व्हिडीओ आले होते. आभासी पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून नेर येथील गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे व सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून दारव्हा येथील गटशिक्षणाधिकारी विलास जाधव उपस्थित होते. केंद्रीय प्राथमिक शाळा,नागनवाडी येथील विद्यार्थी राजवीर निलम प्रशांत मगदूम याला या विशेष  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्याला वर्गशिक्षिका साधना पाटील, मुख्याध्यापिका गीता मोरवाडकर आणि शाळेतील शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययना बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी गुणवत्ता मंचचे राज्यप्रमुख महादेव निमकर यांनी केले, देवराव चव्हाण राज्यप्रमुख वि. गुणवत्ता मंच यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन शितल दुधे संयोजिका विद्यार्थी गुणवत्ता मंच यांनी केले. आभार प्रदर्शन सुवर्णा शिंगोटे जिल्हा संयोजिका पुणे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक आभासी पद्धतीने उपस्थित होते.No comments:

Post a Comment