नेसरी येथील कोलेकर महाविद्यालयामध्ये १३ जून ला आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्राचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2021

नेसरी येथील कोलेकर महाविद्यालयामध्ये १३ जून ला आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्राचे आयोजन

नेसरी येथील कोलेकर महाविद्यालय

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

            येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय व सृजन आॅस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका, आॅस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयामध्ये रविवार (ता.१३)  जून रोजी  आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन केल्याची माहिती प्र. प्राचार्य डाॅ. एस. बी. भांबर, हिंदी विभाग प्रमुख डाॅ. संजय कांबळे यांनी दिली. 

           सदर वेबीनारच्या चर्चासत्राचा विषय ' वर्तमान परिप्रेक्ष्य में मीडीया, साहित्य, समाज और संस्कृति ' असा असून वेबीनारचे उदघाटन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू प्रो. डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. एक दिवशी चर्चासत्रात चार सत्र होणार आहेत. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो. डाॅ. अर्जुन चव्हाण, सुप्रसिद्ध लेखिका प्रो. डाॅ.  पुष्पिता अवस्थी (नेदरलॅंड ), उच्च शिक्षा व शोध संस्थान हैद्राबादचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. डाॅ.  संजय मादार,  विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे डाॅ. दिपक तुपे, सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका ऑस्ट्रेलियाचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती पूनम चतुर्वेदी मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रांचे  अध्यक्षस्थान अनुक्रमे संस्थाध्यक्ष ड. हेमंत कोलेकर, सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका ऑस्ट्रेलियाचे मुख्य संपादक डाॅ. शैलेश शुक्ला, सात्रळ महाविद्यालय अहमदनगरचे हिंदी विभाग प्रमुख डाॅ. भाऊसाहेब नवले, शिक्षण समिती कसबा नेसरीच्या संचालिका डाॅ. अर्चना कोलेकर भूषविणार आहेत. 
No comments:

Post a Comment