गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी पासून दोन की. मी अंतरावर वसलेलेसुमारे ७५० लोकसंख्येचे छोटेस तारेवाडी हे गडहिंग्लज तालूक्यातील गाव आहे. या गावात गेल्या वर्षापासून कोरोना महामारीच्या पहिल्या व दुस-या लाटेत केवळ एकमेव रुग्ण सापडला. कोरोना शिरकाव रोखण्यात तारेवाडीकरांना यश आले आहे. ग्रामपंचायतीचे नेटके यशस्वी नियोजन व ग्रामस्थांचे सहकार्य या समन्वयातून गाव कोरोना मुक्त आहे. कोरोना महामारीत तारेवाडीकरांचे कार्य राज्यात आदर्शवत बनले आहे.
गेल्या वर्षी पासून कोरोना विषाणू संसर्गाचे जगात, देशात व राज्यात थैमान सुरू असून यामध्ये तारेवाडी गाव अपवाद बनले आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन, बाहेरून आलेल्यांचे संस्थात्मक अलगीकरण, मास्क, सॅनिटाझर व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत औषध फवारणी, लक्षणे दिसणा-यांची तात्काळ कोरोना चाचणी व अलगीकरण, प्रबोधन असे अनेक उपाययोजना ग्रामपंचायतीतर्फे केल्या जात आहेत. गेल्या वर्षी पहिला लाटेत तारेवाडीकरांनी मुंबईकर व गावकरी यांच्या समन्वयातून शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात यश मिळविले होते.
दुस-या लाटेतही यश मिळाले असून केवळ गावात एकमेव कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडला असून तोही किरकोळ लक्षणे असल्यामुळे गावातच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली संस्थात्मक विलगीकरणात बरा झाला आहे. प्रासंगिक तात्काळ ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीची बैठक घेवून उपाययोजना करणे, गटा-तटाला थारा न देता नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य या उद्देशाने उपाययोजना आखल्या जात आहेत.
सरपंच मालू भारती, उपसरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुराडे, शिवाजी मेटकर, संगिता देसाई, रेखा धनके, सुरेखा गुरव, कृष्णाबाई तुपूरवाडकर, ग्रामसेवक सुषमा मेटील, तंटामुक्त अध्यक्ष सटूप्पा देसाई, कोरोना दक्षता समिती सदस्य गोपाळ देसाई, एम. आर. पाटील, संभाजी पाटील, रामदास पाटील, उत्तम पाटील, दिनकर मेटकर, सुरेश तुरटे, कर्मचारी सचिन लोहार, पोलीस पाटील सुरेश पाटील, मलाप्पा नाईक, कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. निलेश भारती, नसीम मुजावर, तलाठी संजय राठोड, आरोग्य सेविका सुरेखा मोरे, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सहाय्यक शिक्षक सुरेश गुडूळकर, आशा सेविका सुमन लोहार, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, वैजयंता पाटील, कृषी सहाय्यक सचिन नाईक, आर. वाय. आजगेकर आदींनी गाव कोरोना मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
कोलेकर महाविद्यालयातर्फे जनजागृती
शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन कोविड योद्धा समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे तारेवाडीत माझं गाव कोरोना मुक्त गाव अभियान अंतर्गत कोरोना जनजागृती झाली आहे.
उपसरपंच युवराज पाटील
ग्रामस्थांचे सहकार्य, प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना यांचे काटेकोरपणे पालन व ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती यांच्या समन्वयातून गाव कोरोना मुक्त करण्यात यश आले आहे. सर्वत्र कोरोनाचा शिरकाव वाढत असतानाच आमच्या गावात पहिल्या, दुस-या लाटेत केवळ एकच कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडला आहे. तोही संस्थात्मक अलगीकरणात बरा झाला. गाव कोरोना मुक्तीचे सर्व श्रेय तारेवाडीकर ग्रामस्थांना जाते.
No comments:
Post a Comment