बेळगाव जिल्हा २१ जून पर्यंत लॉक, चंदगड तालुक्यामध्ये नाराजीचा सूर - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2021

बेळगाव जिल्हा २१ जून पर्यंत लॉक, चंदगड तालुक्यामध्ये नाराजीचा सूर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          बेळगाव सह कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना चा संसर्ग अध्याप वाढतच आहे. परिणामी बेळगाव सह कर्नाटक मधील ११ जिल्ह्यातील लॉकडाऊन २१ जून पर्यंत चालूच राहणार आहे. कर्नाटक चे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बेंगलोर मध्ये ही घोषणा केली. तशा सूचना संबंधित अकरा जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन हा १४ जून रोजी संपणार होता. तथापि आता किमान २१ जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
         बेळगाव लॉकडाउनचा सर्वाधिक फटका चंदगड तालुक्याला बसत असून येथील बेळगावशी असलेले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्यात या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान बेळगाव चे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून लहान मुलांसाठी कोविड रुग्णालये उभारणीची तयारी सुरू केली आहे.



No comments:

Post a Comment